पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार
जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय.
पुणे : जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय.
तर दुसरीकडे पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात यावी यासाठी ॲड विनीत जैन यांनी २०१७ साली याचिका दाखल केली होती. पुण्यात २०१७ साली ३०० जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर यावर्षी आतापर्यत २१७ जणांचा मृत्यू झालाय. हेल्मेट सक्तीला कोणी विरोध करू नये, असे अँड विनीत जैन यांनी सांगितले.