Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  लाडकी बहिण योजनेच्या यशा नंतर आता शिवसेनेची “लाडकी भेट, कुटुंब भेट.” मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक घराघरात जाऊन लाडकी बहिण योजनेचा प्रचार करणार आहेत.  शिंदे गटाकडून लाडकी बहिण योजनेचा हायटेक प्रचार केला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाकडून  विशेष अ‍ॅप लाँच केले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाकडून लाडकी बहिण योजनेचा हायटेक प्रचार केला जाणार आहे.  पक्षीय स्तरावर लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी हे विशेष अ‍ॅप लाँच केले जाणार आहे.  लाडकी बहिण कुटुंबभेट असं या अ‍ॅपचे नाव असणार आहे.  या अ‍ॅपमध्ये सर्व लाडक्या बहिणींचा डेटा स्टोर केला जाणार आहे. याआधारे घरोघरी जाऊन कार्यकर्ते सरकारी योजनांचा प्रचार करणार आहेत. तसेच  कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. त्यांची अधिक माहितीही गोळा केली जाणार आहे.  कार्यकर्ते घरोघरी प्रचार झाल्यानंतर कुटुंबातील सर्वा सदस्यांची अपडेट माहिती अ‍ॅपमध्ये नोंद करणार आहेत. 


राज्यातील दिड कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज दहा घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही  याची माहीती घेणार ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना... आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली महत्त्वाची योजना... मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही योजना सुरू केलीय... 21 ते 65 या वयोगटातील महिलांसाठीची ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.