पोलीस भरतीत हायटेक घोटाळ्याचा भांडाफोड, पेपर फोडण्यासाठी खास टी शर्टचा वापर
पेपर लीक करण्याची पद्धत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल `झी 24 तास` इन्व्हेस्टीगेशनमध्ये रॅकेट्सचा पर्दाफाश
कैलास पूरी, झी मीडिया, पिंपरी : पोलिसात भरतीत (Police Recruitment) हायटेक (Hi-tech) टी शर्टाच्या माध्यमातून हायटेक घोटाळा उघड झालाय. पोलीस भरतीचा पेपर लीक करण्यासाठी हे घोटाळेबाज चक्क टिशर्टचा वापर करत होते. भरतीसाठी वापरलेला हा हायटेक फंडा पाहिल्यानंतर तुमचेही डोळे चक्रावतील.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलं रॅकेट उद्धव्स्त
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) युनिट 4 ने केलेल्या एका महत्वपूर्ण कामगिरीत राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार प्रकरणी 6 रॅकेट उद्धवस्त केलीत. त्यामध्ये 56 आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आलीय. एकूण 121 आरोपी असल्याचं आतापर्यंत समोर आलंय. विशेष म्हणजे त्यातील 31 जण पोलिस म्हणून रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये नोव्हेंबर 2021 ला 720 जागांसाठी भरती झाली होती. या परीक्षे दरम्यानच मुन्नाभाई एम बी बी एस प्रमाणे मास्कमध्ये मोबाईल लावलेला उमेदवार आढळल्यान प्रक्रिया भरती राज्यभरात गाजली होती. त्यातच औरंगाबादच्या राहुल गायकवाड पोलिस कॉन्टेबलचा त्यात समावेश असल्याने या परीक्षेची चांगलीच चर्चा झाली होती.
आता त्याच भरती प्रक्रियेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा रॅकेट उध्वस्त केलेत. विशेष म्हणजे या सहा रॅकेटमध्ये 4 टोळ्या औरंगाबादच्या तर एक जालना आणि एक बीडमधली आहे.
धक्कादायक मोडस ऑपरेंडी
या टोळ्यांची पेपर लीक करण्याची पद्धत ही तुमचे डोके चक्रावून टाकणारी आहे. पेपरचा फोटो काढण्यासाठी विशेष टी शर्ट तयार करण्यात आला होता. त्या टी शर्टला आतल्या बाजूने कप्पा तयार करण्यात आला होता. त्या कप्प्याला असं छिद्र पाडलेलं होतं की मोबाईलच्या लेन्समधून फोटो काढता येईल.
पेपर सुरू होताच शर्टचं बटन उघडून मोबाईलच्या साहाय्याने आतील आरोपी फोटो काढत असे. मोबाईलमध्ये असं सॉफ्टवेअर लोड केलेलं असे की मोबाईलचे फोटो थेट Gmail ला जात असत. एकदा पेपर बाहेर गेला का प्रत्येक विषयातील एक तज्ज्ञ अशी टीम लेखी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उत्तर देण्यासाठी तयार असे.
परीक्षा केंद्रात असणारा उमेदवार स्पाय डिव्हाईस घेऊन परीक्षा केंद्रात जात. कानातले ब्लु टूथ ही एवढे छोटे असायचे की ते कळून ही येत नव्हते. त्या ब्लु टूथच्या माध्यमातून बाहेरची टोळी उमेदवारांना उत्तरं सांगत असे.
पण म्हणतात ना, 'कानून के हाथ लंबे होते है' त्यांचं बिंग अखेर फुटलं. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या पूर्वी झालेल्या परीक्षा मध्ये ही या रॅकेटचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणात पोलिसांनी 76 मोबाईल फोन, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी, 11 लाख रूपये रोख, डिव्हाईस लपवण्यासाठी वापरण्यात आलेले कपडे, सिमकार्ड आणि कागदपत्रं जप्त केली आहेत.
ज्यांच्याकडून गुन्हेगार आणि घोटाळेबाजांना पडकण्याची अपेक्षा आहे तेच जर अशा चोरट्या मार्गानं आले तर कायदा सुव्यवस्था टिकणार कशी? त्यामुळे असल्या मुन्नाभाईंना कडक शिक्षा व्हायला हवी.