पुणे : मुंबई-द्रुतगती महामार्गावर पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकानं अटक केली. तापसानंतर खंडणी विरोधी पथकानं त्याच्या इतर ४ साथीदारांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून खंडणी विरोधी पथकानं तब्बल नऊ पिस्तूल आणि १३ जिवंत काडतुसं जप्त केली. 


विशेष म्हणजे ही सर्व पिस्तूल विक्रीसाठी आणली असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षीत असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी ११० पिस्तूल जप्त केली आहेत.