जळगाव : जळगावांत वादळी वाऱ्यामुळे विजेच्या हाय टेन्शन प्रवाहाच्या तारा ऑटोरिक्षावर कोसळल्या. या दुर्घटनेत रिक्षाने पेट घेतला आणि दोन तरुणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. इम्रान शेख फय्याज, इम्रान शेख इम्रान खान असं या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान शेख फय्याज, इम्रान शेख इम्रान खान हे दोघे तरुण मेहरूण परिसरातील संतोषी माता इथे रिक्षात बसलेले असताना रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आलेल्या वाऱ्यामुळे उच्च क्षमतेच्या विजेच्या तारा रिक्षावर कोसळल्या. यानंतर रिक्षाने पेट घेतला.


या घटनेनंतर महावितरण कंपनीशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप नागरिकांनी केलाय.