मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे तब्बल १४,४९२ रुग्ण आढळले आहेत. याआधी २० ऑगस्टलाही एवढेच रुग्ण सापडले होते. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामधली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,७१,९४२ एवढी झाली आहे, यापैकी १,६९,५१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४,८०,११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात ९,२४१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ७१.४५ टक्के एवढं आहे.


राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २१,९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक ७,३८८ जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात ३,६७४ आणि ठाणे जिल्ह्यात ३,५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळाले. पुणे शहरात २४ तासात १,५८१ रुग्णांची नोंद झाली, तर ४० जणांचा मृत्यू झाला. पुणे मनपा क्षेत्रात आत्तापर्यंत २,२८९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईमध्ये आजच्या दिवसात १,१३४ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 


पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १,४७,६७१ एवढे रुग्ण आहेत, यापैकी १,००,५०० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४३,४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात पुण्यामध्येच सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबईत १,३५,३६२ कोरोनाबाधित आहेत, यापैकी १,०९,३६८ रुग्ण बरे झाले आहेत, तर १८,३०१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.