अपहरण झालेल्या बाळाची आठ दिवसात सुटका
अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची सुटका करायला पुणे पोलिसांना आठ दिवसांनी यश आलं आहे.
पुणे : अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची सुटका करायला पुणे पोलिसांना आठ दिवसांनी यश आलं आहे.
फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या आणि फुटपाथवरच राहणाऱ्या कुटुंबाचं हे बाळ होतं. बाळ पळवण्याचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला. ही घटना आठ तारखेला रात्री अडीचच्या सुमाराला घडली. नरेंद्र बागडी आणि त्यांच्या पत्नीचं हे बाळ आहे.
केवळ सीसीटीव्ही फुटेज व्यतिरिक्त कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या.