हिंगणघाट जळीतकांड : पीडित शिक्षिकेचा मृत्यू
डॉक्टरांनी तिला फुलराणी असे नाव दिले होते.
नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे. सकाळी ६.५५ मिनटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी देखील शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
डॉक्टरांनी तिला फुलराणी असे नाव दिले होते. तर ही फुलराणीचे स्वप्न अपूरे राहिले आहेत. सुरवातीला ३ ते ४ दिवस तिने चांगला प्रतिसाद दिला. परंतू शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. शिवाय रक्तदाबात चढ-उतार होत असल्यामुळे तिला श्वास घेण्यात देखील अडथळे येत होते. अखेर आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तोंडात सुज आल्यामुळे तिला बोलता देखील येत नव्हते.