Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. हिरामण खोसकर उमेदवारीसाठी दारोदारी फिरताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं वाटलं होतं. पण त्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी इगतपुरीतून काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अशी गळ खोसकरांनी घातलीय.


 हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या आमदारानं उमेदवारीसाठी शरद पवारांकडे धाव घेतल्यानं काँग्रेस नाराजी झालीय.काँग्रेसचे नेते हिरामण खोसकरांबद्दल आमचा पक्ष येत्या 8 ते 10 दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. ज्यांची जिंकून येण्याची क्षमता त्यांना तिकीट जाईल, असंही यावेळी वडेट्टीवारांनी म्हटलंय...  


हे देखील वाचा... महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!


विधान परिषदेच्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके आणि हिरामण खोसकरांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. यातील जितेश अंतापूरकरांनी आधीच भाजपचं कमळ हाती घेतलंय. झिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच खोसकरांनी पवारांची भेट घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराज झालीय.. खोसकरांवरुन काँग्रेस-पवारांच्या राष्ट्रवादीत तू तू मै मै होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


छगन भुजबळ यांनाही भेटले होते हिरामण खोसकर 


काँग्रेसकडून निलंबनाची टांगती तलवार असलेल्या हिरामण खोसकरांनी भुजबळांची भेट घेतलीय...हिरामण खोसकर-छगन भुजबळ भेटीनं चर्चांना उधाण आलंय...विधान परिषदेत खोसकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा काँग्रेसच्या नेत्यांना संशय आहे...नाशिक दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कारवाई अटळ असल्याचा इशारा दिला होता...मात्र, मतदारसंघातील कामांच्या संदर्भात भुजबळांची भेट घेत असल्याचं खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.. तर खोसकर हे आमचे कार्यकर्ते आहेत, ते भेटतच असतात अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलीय..