धक्कादायक! पुराच्या पाण्यात वाहूून गेली एसटी, नजरेसमोर होत्याचं झालं नव्हतं : VIDEO
पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने दुर्घटना
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे. पुराच्या पाण्यात हिरकणी एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळच्या उमरखेडच्या दहागाव पुलावरून एसटी बस वाहून गेली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने ही दुर्घटना घडली आहे. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी जात असतांना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने नाल्यावरुन नेली. चालकाने कोणताही अंदाज न घेता बस पाण्यात टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते. उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबसच्या टपावर आहेत.