रायगड : रायगडमधील ठिकठिकाणच्‍या कोळीवाडयांमध्‍ये उत्‍साहाचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोळी बांधवांनी आपल्‍या होडयांची रंगरंगोटी करून कापडी पताकांनी आपल्‍या होडया सजवल्‍या आहेत. सकाळी या होडयांचे पूजन करण्‍यात आले. मान म्‍हणून मोठा मासा आपापल्‍या होडीला बांधला... कोळीबांधवांच्या या परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत.   


अलिबाग तालुक्‍यातील थळ, नवगाव, रेव, बोडणी, आग्राव इथल्या कोळी बांधवांनी या सजवलेल्‍या होडयांमधून फेरफटका मारत समुद्रातील खंदेरी किल्‍ल्‍यावर जावून तेथील वेताळेश्‍वराचे दर्शन घेतले.


या सणाच्‍या निमित्‍ताने महिलांना होडीवर जाण्‍याचा मान मिळतो त्‍यामुळे महिलांमध्‍ये या सणाला विशेष महत्त्‍व आहे.


अलिबागच्‍या समुद्रात होडयांची जणू जत्राच भरली होती. रात्री होलीकामातेचे पूजन करून नारळाचे तोरण वाहिल्‍यानंतर होळीचे दहन केले जाणार आहे.