फडणवीस यांच्या पोलीस चौकशीवर गृहमंत्री म्हणाले.. या कारणामुळे दिली नोटीस
राज्य गुप्त वार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेली. त्यामुळे काही अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई : गुप्त वार्ता विभागाची काही माहिती अज्ञात इसमाने बाहेर नेली होती. त्यासंदर्भांत मार्च २१ मध्ये भारतीय टेलिग्राफ ऍक्ट, माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
यातील काही माहिती देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांना २१ ऑगस्ट २१ ला पहिली, ६ सप्टेंबर २१ ला दुसरी, ८ ऑक्टोम्बर २१ ला तिसरी, १७ नोव्हेंबर २१ ला चौथी त्यानंतर २ मार्च २२ ला पाचवी आणि ११ मार्च २२ ला सहावी अशा नोटीस देण्यात आल्या होत्या.
विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना फक्त नोटीस पाठविली आहे, समन्स नाही. फडणवीस यांनी सभागृहात जे काही सांगितले. एसआयटीमधून ही माहिती बाहेर कशी गेली याची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले होते. शेवटी त्यांनी कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही हे अधिकार त्यांचे आहेत.
पोलिसांनी फडणवीस यांना आधी ज्या नोटीस पाठविल्या होत्या. तेव्हा त्यांना प्रश्नावली पाठविण्यात आली होती. त्याचे त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे आज त्यांच्या घरी जाऊन जबाब घेतला गेला. त्यात गैर असे काही नाही. त्यांना आरोपी म्हणून नाही तर त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची गरज नाही. ही एक वर्ष जुनी केस आहे. त्यांचा जबाब थांबला होता. त्यासाठीची चौकशी आहे. एसआयटीमधून हा डेटा बाहेर कसा गेला. कोण जबाबदार आहे. पाच अज्ञात इसमांविरीधात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात अशी प्रथा नव्हती हे बरोबर आहे. मात्र, माहिती घेण्यासाठी ही चौकशी आहे. रश्मी शुक्ल आणि इतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यात काही लोक समोर येत आहेत, असेही गृहमंत्री म्हणाले.
आम्ही vindictive पद्धतीने नाही तर डेटा कसा बाहेर पडला याची माहिती घेत आहोत. विरोधी पक्षनेते चौकशीला उत्तर देण्यास बांधील आहेत की नाही याबाबत मी अभ्यास करेन. माझा अभ्यास कमी पडत असेल. राज्य गुप्त वार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेली. त्यामुळे काही अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ज्यांचा संबंध आहे त्यांचा जबाब घेणं गरजेच आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
भाजपने राज्यभरात जे आंदोलन केले त्याची काही आवश्यकता नव्हती. एवढा दंगा करण्याची गरज नव्हती. या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करतच आहे. मात्र एसआयटीचा हा डाटा बाहेर कसा गेला यासंदर्भात आजची चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले.