मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवले जात असल्याचा तसेच हेरगिरीचा आरोप केला होता. पण या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वऴसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विट करत त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजीराजे सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते राज्याचा दौरा करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून  पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे.'



संभाजीराजे यांनी देखील यानंतर ट्विट करत हा विषय संपल्याचं म्हटलं आहे.