सातारा : साता-यातील जागतिक वारसा असलेल्या कास पठारावार अज्ञात व्यक्तीनं चक्क जैविक कचरा जाळल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एकीव गावाच्या रस्त्याजवळ औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकीटं असा जैविक कचरा जाळण्यात आला आहे. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून नियमांचा भंग करुन हा कचरा जाळण्यात आला आहे. यामुळे या भागातील जैवविविधतेचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा-जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार भागात अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकीट असा जैविक कचरा जाळल्याचे समोर आलं आहे. सातारा कास रस्त्यावर एकीव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा जैविक कचरा आणून अज्ञात व्यक्तीने जाळला आहेय त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शासकीय नियमाप्रमाणे अशा जैविक कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे अपेक्षित असते.  हे अशा पद्धतीने निर्जन स्थळी आणून जाळल्याने या भागातील निसर्ग आणि त्याचबरोबर आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. 



कास पठारावरील वेगळेपण 


कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रानफुलांचा हंगाम समाप्तीबरोबरच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ असतो. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, पठारावर सर्वात जास्त आणि प्रमुख आकर्षित ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले अतिपावसामुळे अगदी कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळतात.