चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथच्या (Ambarnath) बायपास रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघाता इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारची अवस्था पाहूनच अंगावर काटा येत आहे. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत (Accident). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथ येथील गोविंद पूल लोकनागरी बायपास रस्त्याजवळ  कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार जण गंभीर रित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


या अपघातात कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर, आतील सीट देखील तुटले आहेत. अपघात होताच रस्त्यावरील प्रत्यक्षर्शींनी तात्काळ जखमींना मदत देत नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. 


अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी येत पंचनामा केला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र, या कारची अवस्था पाहून नागरीक भयभित झाले. वेळीच मदत मिळाले अपघातग्रस्त बचावले आहेत. 


माथेरान घाट रस्त्यावर धावत्या कारला आग 


माथेरान घाट रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. माथेरान नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आग आटोक्यात आणली. मात्र, कार आगीत जळून खाक झाली आहे. ही कार नेरळहून माथेरानच्या दिशेने निघाली होती. या अपघातमुळे माथेरानकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता.