Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेची रिमांड संपल्याने कोर्टात नेलं जात असतानाच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याने  पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. नेमका हा सगळा घटनाक्रम काय आहे जाणून घेऊयात. 


जाणून घ्या सगळा घटनाक्रम - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला. 


- सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या. 


- अक्षय शिंदेने पोलीस अधिकीर निलेश मोरे यांचीच बंदूक खेचली होती. 


- मुंब्रा बायपासजवळ हा सगळा प्रकार घडला आहे. 


- या झटापटीत पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. 


- यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता. 


- त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला. 


- दरम्यान हा ठरवून केलेला एन्काऊंटर होता का? अशी विचारणा विरोधक करत आहेत. 


- याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.