रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खळबळजनक ठरला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येऊन उ्द्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील असे वाटत असताना भाजपाने महाराष्ट्रातही धक्कातंत्र अवलंबले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी नेते यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात एका रात्रीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कसे बनले ? मुंबई आणि दिल्लीतून कशा हालचाली झाल्या ? हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री ९:३० : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी पोहोचले. १७३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सादर केला. ५४ आमदार राष्ट्रवादीचे तर १४ अपक्ष आमदार असल्याचा दावा केला. 


रात्री १२ वा. : राष्ट्रवादी विधीमंडळ नेता अजित पवार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पोहोचले. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे समर्थन राज्यपालांकडे दिले. तसेच भाजपला समर्थन देणारे पत्र अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादीचे पत्र मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचे संख्याबळ असल्याबाबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे समाधान झाले.



रात्री १२:३० : सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती शासन हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारला राज्यात सरकार बनवण्याची परिस्थिती असल्याबाबत माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी शिफारस केली. 


सकाळी : ५:३० वा : राष्ट्रपती शासन हटवल्याची माहिती राज्यपाल कोश्यारी यांना दिली. 


सकाळी ६ वा : देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पोहोचले आणि आजच शपथविधी घेतला जाणार असल्याचा निर्णय घेतला.


स. ६:३० वा. : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांना शरथविधीसाठी निमंत्रण दिले. तसेच सकाळी शपथविधी आयोजित केल्याची माहितीही दिली. 


स. ८ वा. : भाजपला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी स. ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी सोहळा संपला...