Guillain Barre Syndrome Death: GBS म्हणजे गिया बारे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण पुण्यामध्ये अचानकपणे वाढू लागले आहेत. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णांनी महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवली आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत खबरदारी घेतली जात आहे.  गिया बारेमुळं मृत्यू झालेल्या तरुणाला नेमका काय त्रास झाला होता? जाणून घेऊया सविस्तर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, पुण्यात काम करणाऱ्या एका 41 वर्षांच्या सीएचा मृत्यू गिया बारेमुळं झाला. 9 जानेवारी रोजी या रुग्णाचे पोट बिघडले होते. त्याला जुलाबाचा त्रास होत होता. त्यासाठी त्याने औषधदेखील घेतलं होतं. 14 जानेवारी रोजी तो त्याच्या कुटुंबासह सोलापूरलादेखील गेले. रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी रोजी पुन्हा एकदा त्याला अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


रुग्णालयात जवळपास सहा दिवस त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मात्र अचानक त्याची तब्येत बिघडली आणि शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकाने दिली आहे. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णला थकवा होता तसंच त्याला लकवादेखील मारला होता. त्यानंतर आम्ही मांसपेशींयाची चाचणी केली आणि गिया बारेच्या दृष्टीने उपचारांना सुरुवात केली. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होत होती. मात्र नंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. संपूर्ण शरीर कमजोर पडले आणि शरीराला लकवा मारला. 


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढली?


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही 111 वर गेली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक ही आहेसध्या 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना या आजाराची बाधा होत आहे. 


गिया बारे सिंड्रोम कोणाला होतो?


Guillain-Barré सिंड्रोम (GBS) कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु याचा सर्वाधिक परिणाम 30 ते 50 वयोगटातील लोकांना होतो.


लक्षणे आणि कारणे


लक्षणे अचानक दिसतात आणि त्यात स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अर्धांगवायू आणि बरेच काही समाविष्ट असू शकते.गिया बारे सिंड्रोम ही एक दुर्मिळ  स्थिती आहे ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या नसांवर हल्ला करते. पायातील चप्पल गळणे, जुलाब होणे, अशक्तपणा येणे, हाता पायाला मुंग्या येणे अशी लक्षण असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.शिळे अन्न खाऊ नका. नॉनव्हेज चांगले शिजवून खावा. आजार 100% बरा होतो.