मुंबई : तुम्हाला बांधकाम व्यावसायिक वेळेत घर देत नाही किंवा आधी सांगितलेल्या सोईसुविधा दिल्या नाहीत तर मग आता फक्त ईमेलवर तक्रार करा. आता पाच हजार क्वेअर फुट बांधकाम किंवा आठ फ्लॅट आणि त्यापेक्षा जास्त अशा सगळ्यांना महारेराकडे नोंद करणं गरजेचं आहे. असं असतानाही नोंद केली नसेल अथवा ग्राहकांची बिल्डरने फसवणूक केली असेल तर महारेरा अंतर्गत प्रकल्पांच्या दहा टक्के दंड बिल्डरला करण्याची तरतूद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी ग्राहकांना तक्रार करायची झाल्यास source detail@maharera.mahaonline.gov.in वर माहिती द्यावी. 1 ऑगस्टपासून ग्राहकांना ईमेलवर तक्रार नोंदविता येणार आहे. त्यात आज शेवटचा दिवस असल्याने महारेराकडे नोंद करण्यासाठी बिल्डरांची धावपळ सुरू आहे. आतापर्यंत सात हजार बिल्डरांनी महारेराकडे नोंद केली आहे.