Uddhav Thackeray New Political Party : कसा असेल उद्धव ठाकरे यांचा नवीन पक्ष? कोण असेल पक्ष प्रमुख?
Uddhav Thackeray New Political Party : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला. पण, चेहरा चोरासारखा झाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
Uddhav Thackeray and Shiv Sena Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून शिवसेना पक्ष गेला आहे. यामुळे नवीन पक्ष उभारण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर उभ राहिलं आहे. पक्ष आणि चिन्ह चोरले आहे. यामुळे शिवसेना कुणी संपवू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नव्याने शिवसेना उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. कसा असेल उद्धव ठाकरे यांचा नवीन पक्ष याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे (Maharashtra Politics News).
शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु होता. अखेरीस शिंदे गटाला शिवसेना पक्षाचा ताबा मिळाला आहे. यामुळे उद्धव ठाकरें नवा पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांच्या नवीन पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) असेच असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचं काम ठाकरे गटाकडून सुरू आहे. नव्या पक्षाची नवीन घटना बनवण्यासाठी ठाकरे गटाकडून लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे.
शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्यासाठी ठाकरे गट जोमाने कामाला लागला आहे. अर्थात नव्या घटनेत जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच गाभा असणार आहे. उद्धव ठाकरे हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या पक्षाचे पक्ष प्रमुख असणार आहेत. या नव्या पक्षाचे सर्वाधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे यांच्याकडेच असणार आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवे पक्षप्रमुख होणार?
शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. शिवसेनेतील महत्वाच्या पदांवर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे पक्ष प्रमुख हे पद जवळपास संपुष्टात आले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नवे पक्षप्रमुख होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे (Maharashtra Politics News).