HSC Exams : वर्षभर केलेला अभ्यास, (Corona Period) कोरोना काळातह सातत्यानं बदलणारी महाविद्यालयीन वेळापत्रकं आणि शैक्षणिक वर्षात झालेले बदल ओलांडून आता इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्यांसाठी महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. कारण, आज (मंगळवार)पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. पहिल्याच पेपर इंग्रजीचा असून, सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा पेपर पार पडेल. या पेपरला वाढील 10 मिनिटांचा वेळही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीच्या परीक्षेच्या एक दिवस आधीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. जिथं विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जास्तीच्या 10 मिनिटांचाही उल्लेख करण्यात आला. दरम्यान, यंदाच्या वर्षी परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तैनात असतील. विद्यार्थ्यांनी किमान साडेदहा वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्रांवर पोहोचणं अपेक्षित असेल. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निघणं अपेक्षित असेल. (HSC Board Exams starts from today important instructions to students latest Marathi News)


विद्यार्थ्यांना नसेल ही सुविधा... 


यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी ही परीक्षा देत असून, यावर्षी काही बदलांमध्ये बदलही झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेआधी पोहोचणं अपेक्षित असून, सकाळी 10.30 वाजल्यानंतर आणि दुपारी 2.30 वाजल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, अशी ताकिदच बोर्डाकडून देण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना पेपर सुरु होण्याच्या 10 मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात येणार नाही. शिवाय परीक्षा कक्षामध्ये उत्तर पत्रिकेवरील सूचनाही विद्यार्थ्यांना वाचून दाखवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर गांभीर्य पाहता कलम 144 अंतर्गत काही प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील. 


हेसुद्धा वाचा : शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?


इतकंच नव्हे, तर प्रत्येक परीक्षा केंद्रापासून किमान 50 मीटर अंतरावर कोणत्याही व्यक्तीला (विद्यार्थ्यांव्यतिरिक्त) फिरकण्याचीही परवानगी नाकारण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रापासून कोणत्याही दिशेला 50 मीटर अंतरावर असणारी झेरॉक्सची दुकानंही परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील.