HSC Board Exam 2023: बारावीची बोर्डाची परीक्षा (HSC Exams) 21 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली. यंदाच्या परीक्षेत कॉपीचे (Copy) प्रकार रोखण्यासाठी काही कठोर नियम बनवले आहेत. पण किती कठोर नियम बनवले तरी यंदाही कॉपीचे सर्रास प्रकार उघडकीस येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) एका परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. कंधार तालुक्यातील चिखली इथल्या परिक्षा केंद्रावर 12 वीच्या विद्यार्थांना थेट वर्गात घुसून कॉपीचे चिठोरे पुरवले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर (English Paper होता. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. शाळेवर असलेल्या परिक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केला आहे. वर्गात परीक्षा सुरु असताना बाहेरचे काही जण थेट शाळेत घुसून खिडकीतून कॉपीचे चिठोरे विद्यार्थ्यांच्या हातात देत आहेत. काही जणांनी तर कहरच केल्याचं दिसत आहे. थेट वर्गात घुसून विद्यार्थ्यांनी कॉपी पुरवली जातेय. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर एकही पोलीस दिसत नाहीए. इतकंच काय तर वर्गात असणारे परीक्षकही यावर कोणताच आक्षेप घेताना दिसत नाहीएत. 


चिखली इथल्या परिक्षा केंद्रावरील कॉपी पुरवतानाचे व्हिडीओ आता सोशलमिडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. कॉपी मुक्तीचा नांदेड पॅटर्न राज्यभर राबवल्या जातोय. मात्र या  पॅटर्नचा नांदेडच्याच परीक्षा केंद्रावर फज्जा उडालाय.



 


HSC Board चे कॉपीमुक्त अभियान


दहावी आणि बारावी परीक्षांदरम्यान यंदा बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात असणारी झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच मोबाईल वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे. 


पहिल्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी उत्तर


दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठा घोळ उडाला. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी चक्क उत्तर छापण्यात आलं होतं. ( Error in English Subject Question Paper). त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.  बारावी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापण्या आलं आहे. आता या प्रश्नाचे मार्क मिळणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.


<>


शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल


दरम्यान पेपर गोंधळ प्रकरणाची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रिंटरवर कडक कारवाईक करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, बोर्डाच्या चीफ मॉनिटरच्या अहवाल नंतर मुलांना कीती मार्क देयायचे ते ठरवले जाईल असं केसरकर यांनी म्हटलंय  आहे. तसंच परभणी पेपरफुटी प्रकरण आणि यवतमाळ पेपर फेसबुक प्रकरणात कडक कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना


महाराष्ट्रात यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने काही सूचना केल्या आहेत. पेपरच्या अर्धातास आधी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे.