परभणीत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
देशात सध्या बर्ड फ्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
परभणी : येथील मुरुंबा शिवारात शेकडो कोंबड्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून चार शेतकऱ्यांच्या शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत पक्ष्यांचे सर्वेक्षणकरून कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावात आणि 5 किलोमीटर परिसरात कोंबड्याची खरेदी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे.
कृषी विद्यापीठातील तज्ञांनी या पक्षांची पाहणी केली असून बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणे आढळली नसल्याचे कुकुट पालकांचे म्हणणे आहे. तर अहवाल येई पर्यंत कोबड्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे सांगण्यात येवू शकत नाही.
देशात सध्या बर्ड फ्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे वसंतराव नाईक विद्यापीठातील तज्ज्ञांनी पहाणी केली. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.
दोन दिवसांनंतर यासंबंधी अहवाल येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बर्ड फ्लूच्या (Bird Flu) वाढत्या फैलावामुळे देशभरात भीती पसरली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात आहे.