दोन घडीचा डाव! लग्नाच्या पाच महिन्यांतच पत्नीपाठोपाठ पतीचा टोकाचा निर्णय, कारण काय?
Gondiya Husband Wife Death News: गोंदियात पत्नीपाठोपाठ पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
गोंदियाः प्रेम विवाह (Love Marriage) केला लग्नाला पाच महिने झाले पण नंतर त्यांच्या संसाराला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. पत्नी पाठोपाठ पतीनेही आपले जीवन संपवले आहे. (Husband Suicide After Wife Death) दोघा पती-पत्नीच्या मृत्यूने कुटुंबात एकच खळबळ माजली आहे. दोघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कोडे मात्र सुटता सुटत नाहीये. (Gondiya Husband Wife Death News)
पाच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे काल शुक्रवारी पतीने तर दोन दिवसापूर्वीच पत्नीने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जोडप्याचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला होता.
पत्नीपाठोपाठ पतीची आत्महत्या
पत्नी दीकेश्वरी भुसारीने गोंदिया चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी घेत आत्महत्या केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. डूग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर भुसारी असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी दीकेस्वरी हीने याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती.
बॅगेत शिर नसलेला महिलेचा मृतदेह, हातावरील टॅटूमुळं गूढ उकललं, आरोपीला पाहताच...
पोलिसांकडून शोध सुरू
पत्नी पाठोपाठ आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली आहे. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
मुंबईत राहणाऱ्या पतीसोबत कडाक्याचे भांडण, पत्नीने तीन मुलांचा जीव घेतला अन् मग...
पतीसोबतच्या भांडणात तीन मुलांना विहिरीत फेकले
एका महिलेने आपल्याच पोटच्या मुलांचा जीव घेतला आहे. फोनवर बोलताना पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून महिलेने तिच्याच तीन मुलांना विहिरीत फेकले आहे. मुलांना विहिरीत फेकल्यानंतर तिने स्वतःला घरात बंद करुन पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. आग भडकत गेल्यानंतर शेजाऱ्यांनी तिचा आरडा-ओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. घरावर पाणी टाकून तिला आग विझवण्यात आली. तिला घराबाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी मुलांविषयी विचारणा केली. त्यावर तिने घडलेली घटना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी तिला ताब्यात घेतले आहे.
... तर वाचले असते शेकडो लोकांचे प्राण, रेल्वे दुर्घटनेनंतर 'कवच'बाबत समोर आली मोठी अपडेट