नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आपलं मन वळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितंलय. एकनाथ खडसे नागपुरात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितंलय. तर एकनाथ खडसे नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याची चर्चा होती. भगवानगडावरील त्यांच्या भाषणानंतर नाराज एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, पण मी भाजपामध्येच असल्याच एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.



पण हे सांगत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आपण भेट घेणार असल्याचंही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं. पण ही राजकीय भेट नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.