राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे.
जळगाव : कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजपने तिकिटाचा पत्ता कापल्यावर खडसे यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भेटल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. याबाबत खडसेंनी इन्कार केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा दावा खडसेंनी केला आहे.
गेली तीन वर्षे कोणत्याही पवारांना भेटलेलो नाही, असे माध्यमांसमोर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क करून मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याे खडसे आता सांगत सुटले आहेत. भुसावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खडसे बोलत होते.
त्याचवेळी त्यांनी म्हटले आहे, मला उमेदवारी मिळणार नाही, अशी सूचा दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि माझ्यात चर्चा झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का, असा प्रश्न खडेस यांनी यावेळी उपस्थित केला.