मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पण छगन भुजबळ यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मी शिवसेनेत जाणार नाही. शिवसेनेत जाण्याच्या चर्चेला तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले आहे.


राष्ट्रवादीला खिंडार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासह मुंबईतील कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार आहेत. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. सचिन आहिर यांना मानणाऱ्या गटालाही यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत आधीच बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.