आयएएस तुकाराम मुंढे यांचा या माणसाला सलाम, म्हणाले....
आयएएस तुकाराम मुंढे हे एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष देखील वाढला आहे. नको त्या आणि
सोलापूर : आयएएस तुकाराम मुंढे हे एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्या जीवनात संघर्ष देखील वाढला आहे. नको त्या आणि ज्या गोष्टी कायद्यात बसत नाहीत याला तुकाराम मुंढे यांचा काहीही झालं तरी विरोध दिसून येतो. यामुळे तुकाराम मुंढे यांना बदल्यांचा सामना देखील करावा लागतो. जनतेच्या अडचणी सोडवण्यावर तुकाराम मुंढे यांचा नेहमीच भर असतो. तुकाराम मुंढे हे एक सुधारणावादी धोरण घेऊन पुढे जाणारे अधिकारी आहेत, अशी त्यांची जनसामान्यात ओळख आहे.
मात्र या तुकाराम मुंढे यांनी एका शिक्षकाला त्यांच्या कार्यामुळे सलाम ठोकला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेचे शिक्षक ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना तुकाराम मुंढे यांनी सलाम ठोकला आहे.
तुकाराम मुंढे यांनी रणजितसिंह डिसले यांच्यासाठी एक ट्ववीट केलं आहे. Kudos to The Real Leadership in Education म्हणजे शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा असं ट्ववीट तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.