मुंबई : विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पदवीचं शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे. पदवी शिक्षण अभ्यासक्रम आता 3 वर्षांऐवजी 4 वर्षांचा होणार आहे. अभ्यासक्रम कालावधीबाबत राष्ट्रीय शिक्षण धोरण संदर्भातील डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माशेलकर समितीच्या शिफारशींवर मुख्यमंत्री ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे. या अहवालातील शिफारशींनुसार पदवीसाठी सध्या सुरू असलेला तीन वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षे करण्याबाबत योजना आखण्यात येणार आहे. 



माशेलकर समितीच्या शिफारशी कोणत्या काय आहेत?
- पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षांचा करणे
- 50 वर्षे पूर्ण झालेल्या शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाचा दर्जा द्यावा
- विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी
- शैक्षणिक रिक्त पदे भरण्यात यावीत
- दहावीनंतर शैक्षणिक तांत्रिक अभ्यासक्रम करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी
- परदेशी विद्यापीठांना राज्यांमध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद करण्यात यावी
- डिजिटल शिक्षणासाठी तीन हजार कोटींची तरतूद अपेक्षित आहे.


आतापर्यंत पदवी अभ्यासक्रम 3 वर्षांचा होता. मात्र आता 4 वर्षांचा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आराखडा तयार करण्यासाठी मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाची समिती तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.