...तर काँग्रेसची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : तुझं माझं जमेना तुझा वाचून करमेना असं काहीसं वातावरण सेना-भाजप युतीमध्ये दिसून येतंय. एकीकडे पालघर निवडणुकीत सेना-भाजपमध्ये क्लिप युद्ध चांगलच तापलंये तर दुसरीकडे शिवसेनेशी युती करणे ही भाजपची अगतिकता आहे अशी कबुली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. शिवसेना-भाजप युती झाली नाही तर काँग्रेसची सत्ता येईल असंही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत.