नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे लाखो जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय. अनेकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केलंय. कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांमध्ये तुम्ही देखील आहात ? आणि तुम्ही कोणता व्यवसाय सुरु करु इच्छिता ? तर केवळ २५ हजारांची गुंतवणूक करुन हा व्यवसाय तुम्ही नक्की करायला हवा.


पोह्याचा स्टॉल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाश्त्यामध्ये पोहे सर्वांनाच आवडतात. आरोग्याला आणि पचायला देखील चांगले असतात. तुम्ही पोह्याचा स्टॉल लावू शकता. यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. एक मोठा व्यवसाय म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. पुढे जाऊन तुम्ही पोहे बनवण्याचे युनिट लावून आपला व्यवसाय देखील सुरु करु शकता.



कुठे मिळेल कर्ज ?


खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या प्रोजेक्ट प्रोफाइल रिपोर्टनुसार पोहा मॅन्यूफॅक्चर यूनिट प्रोजेक्ट साधारण २.४३ लाखांपर्यंत असतो. यासाठी सरकार तुम्हाला ९० टक्के कर्ज देते. तुम्हाला केवळ २५ हजारांची गुंतवणूक यासाठी करावी लागणार आहे.


कुठे होईल खर्च ? 


KVIC च्या रिपोर्टनुसार तुम्ही पाचशे स्क्वेअर फूट जागेत हे युनिट लावू शकता. यासाठी १ लाख रुपये खर्च करावे लागतील. पोहा मशिन, सिव्स, भट्टी, पॅकींग मशीन, ड्रम वैगेरेचा खर्च १ लाख इतका येईल. अशाप्रकारे एकूण २ लाख खर्च येईल. तर वर्कींग कॅपिटल म्हणून ४३ हजार रुपये खर्च होतील. 


प्रोजेक्ट सुरु केल्यानंतर तुम्हाला कच्चा माल घ्यावा लागेल. यावर तुम्हाला साधारण ६ लाख इतका खर्च येईल. याशिवाय साधारण ५० हजार रुपये खर्च होतील. अशाप्रकारे १ हजार क्विंटल पोह्याचं प्रोडक्शन करु शकता. यावर साधरण ८.६० लाख रुपये उत्पादन खर्च येऊ शकतो.


किती होईल कमाई ?


तुम्ही १ हजार क्विंटल पोहे साधारण १० लाखाने विकू शकता. म्हणजे तुमची १.४० लाखांची कमाई होऊ शकते. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करु शकता आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत अर्ज केलात तर तुम्हाला ९० टक्के कर्ज मिळू शकते. KVIC तर्फे दरवर्षी ग्रामीण इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज दिलं जातं. तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता.