नाशिक | हॉटेलमध्ये किंवा धाब्यांवर अवैधपणे दारूविक्री होत असल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र नाशिक जिल्ह्यात चक्क दूध-कोल्ड्रींकच्या दुकानातच बिअर बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झी 24 तासच्या इन्स्वेस्टीगेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.  झटपट पैसे कमावण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही? पैशाच्या याच मोहापायी एका दूध विक्रेत्यानं चक्क दुधाच्या दुकानातच बिअर बार थाटलंय. (Illegal liquor has been being sold for the last 6 to 7 years at Dudh Dairy in Taked village in Igatpuri taluka of Nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद गावातील गजनान दूध डेअरीत अशी रोजरोजसपणे दारूविक्री सुरूंय. झी 24 तासनं या अवैध्य धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी थेट दुकानावर धडक दिली. झी २४ तासचा कॅमेरा दिसताच दुकानात एकच धावपळ सुरू झाली. दुधाच्या प्याल्यातून मद्याचे पेग रिचवणारे तळीराम तोंडं लपवू लागली. 



निर्लज्जपणाचा कळस म्हणजे या दूध डेअरीत गेल्या सहा ते सात वर्षांपासून अशी अवैध दारू विक्री सुरूंय. ग्रामपंचयातीनं याविरोधात ठराव केले. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारही दिली. 


पण गेंड्याची कातडी असलेल्या सरकारी बाबूंना या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मुहूर्तच सापडलेला नाही. सरकारी अनास्थेमुळे अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या गावगुंडांचं चांगलंच फावलंय. पण त्याचा त्रास गावातल्या महिलांना सहन करावा लागतोय.