अंबरनाथ : रेल्वे स्थानक परिसराला लागून असलेल्या एसटी महामंडळाच्या  मोकळ्या जागेमध्ये बेकायदेशीर वाहनतळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या नावाने तयार केलेल्या पावत्या देऊन नागरिकांकडून सऱ्हास वसुली केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यवर्ती ठिकाणी एसटी आगाराची जागा रिकामी आहे. याठिकाणी महामंडळाकडून पार्किंगसाठी कायदेशीर ठेकेदार नेमला होता मात्र  त्याचा  ठेका चार महिन्यापूर्वी रद्द करण्यात आला होता. या 'पे आणि पार्क'बद्दल ठेकेदाराला विचारले असता त्याची भंबेरी उडाली. 


वाहनतळासाठी ठेका देण्याबाबत  महामंडळातर्फे वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरु असून अजून कोणालाही ठेका देण्यात आला नसल्याच एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.