Nashik Malegaon News:  दारु, सिगारेट, ड्रग्ज... तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. यात आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. अनेक तरुणांना या नव्या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. नाशिक शहरासह मालेगाव शहरात या कुत्ता गोळीची नशा केली जात आहे.  ग्रामीण पोलीसांनी नुकतीच एक मोठी कारवाई करत कुत्ता गोळी विकणाऱ्यांचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे व्यसन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता नाशिक शहरातही या कुत्ता गोळीची नशा केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यात मोठी कारवाई करत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. 


दारु आणि इतक अंमली पदार्थाच्या तुलनेत कमी पैशात याची नशा करता येते. शिवाय झिंगही लगेच येत असल्याने अनेक तरुण या कुत्ता गोळीचे व्यसन करु लागले आहेत. एक ते दोन रुपयांना मिळणारी गोळी दारूच्या तुलनेत स्वस्त असल्याने कुत्ता गोळीची मागणी वाढली आहे. 


काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.  न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याला पोलिसांनी अटक केली.  रईस याची झाडाझडती घेतल्यानंतर 10 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या कुत्ता गोळीच्या स्ट्रिप्स आढळून आल्या.  10 हजार 80 रुपयांच्या 280 स्ट्रीपचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. मालेगावमध्ये तीन ठिकाणी कुत्ता गोळीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाई वरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या गोळीची विक्री ताबवण्यासाठी तसेच तरुणांनी याची नसा करु नयेसाठी पोलिस विशेष प्रयत्न करत आहेत. असा प्रकारच्या गोळी विक्रीबाबात माहिती मिलाल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा असे आावहन करण्यात आले आहे. यासाठी  6262256363 हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. 


कुत्ता गोळी खाल्ल्यावर नशा येते


18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांना या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. 15 गोळ्या 36 रुपयांना मिळतात. शिवाय याची नशा करताना कोणतीही अडचण येत नाही.  कुत्ता गोळीचं वैद्.कीय भाशेतूल नाव अल्प्रलोजोम असं आहे. या गोळीच्या अतिसेवनामुळे शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. व्यसनी तरुण याचा वापर नशा येण्यासाठी करतात. या गोळीच्या सेवनाने थेट मेंदूवर परिणाम होतो. याच्या सेवनामुळे नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहते. ही गोळी एक उत्तेजक पदार्थ आहे.  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र, अनेक एजंट बेकायदेशीररीत्या सार्सपणे या गोळीची विक्री करतात.