नागपूर : कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी एका तरुणाची निघृणपणे हत्या झाली आहे. या हत्येने पुन्हा एकदा नागपूर हादरलं आहे. योगेश धोंडगे असं मयत तरुणाचं नाव आहे. कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर जवळील नाल्यात मारेक-यांनी धारदार शस्त्रांनी वार करत योगेशची हत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींनी हे कृत्य करून तेथून पळ काढला. गंगाबाईट घाट शेजारील नाल्यात उतरून आरोपींनी सपासप वार करत योगेशची हत्या केली. दोन मारेकरी आणि महिलाही यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळता आली. दरम्यान या हत्यांकांडानंतर शिवाजी नगर परिसरात खळबळ उडाली. कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत.     


नागपुरातील तरुणाच्या हत्येचा थरारक व्हीडिओ व्हायरल झालाय. योगेश धोंडगे असं मयत तरुणाचं नाव आहे..कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजीनगर शेजारील नाल्यात मारेकरी योगेशवर धारदार शस्त्रानं वार करत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गोलू धोटे या आरोपीला अटक केली आहे.


दुपारी 12 च्या सुमारास योगेशवर हा हल्ला झाला. शिवाजीनगर परिसरात रहात असलेला योगेश घरी असताना गोलू त्याच्या घराजवळ आला. तिथे योगेश आणि गोलू यांच्यात वाद झाला.त्यानंतर योगेश घरालगत असलेल्या नाल्याजवळ गेला असताना गोलूनं त्याला नाल्यात पाडले. गंगाबाई घाटाशेजारील नाल्यात योगेशवर गोलूनं धारदार शस्त्रानं वार सुरु केले.यावेळी योगेशला मारू नका अशी याचनाही काही जण करत असल्याचं व्हीडिओमधील आवाजात ऐकू येतंय. मात्र डोक्यात सैतान स्वार असलेल्या गोलूनं नाल्यात योगेशला पाडत त्याच्यावर वार सुरुच ठेवले.


गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालाय दाखल केले ..मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं..त्यानंतर गोलू फरार झाला. मात्र त्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या हत्येच्या घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल झाला. योगेश आणि गोलू हे दोघेही मित्र असून एकाच परिसरात रहात होते. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.