मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरिपाचा हंगाम तोंडावर आला आहे. राज्याच्या बहुतांश भागातले शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांनी इतक्यात पेरणी करू नये असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलंय. सध्या जो पाऊस पडतोय तो हलक्या स्वरूपाचा आहे. जमिनीत फारसा ओलावा निर्माण होत नाही. 


शेतक-यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. यंदा मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येईल असेही भुसे यांनी सांगितलं. 
 


  1. सोयाबीन पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते

  2. कपाशी पेरणी 15 जुलै पर्यंत

  3. उडीद मूग 30 जून पर्यंत पेरणी करता येते