पावसासंदर्भात मोठी बातमी, हवामान विभागाकडून `या` जिल्ह्यात यलो अलर्ट
राज्यात पावसाने हजेरी लावली आहे, मात्र अद्याप हवा तसा दमदार पाऊस पडला नाही
मुंबई : राज्यात पावसाने हजेरी लावली आहे, मात्र अद्याप हवा तसा दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यातील नागरीकांचे डोळे दमदार पावसाकडे लागले आहेत.त्यात आता पावसासंदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. (IMD forecasts heavy rainfall in mumbai this sunday issues yellow alert for some district)
कोकणात पावसाचा वेग वाढणार
राज्यात अद्याप दमदार पाऊस पडला नाही आहे, त्यामुळे सर्वंच नागरीकांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मात्र आता पावसाची जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण आता उद्यापासून पावसाचे प्रमाण हळूहळू वाढणार आहे.
गुरुवारी नैऋत्य मोसमी पावसाने जवळपास संपूर्ण राज्य व्यापले होते. “सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचे प्रमाण 18 जून 2022 पासून हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे.या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे," असा IMD ने अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस
रविवारी मुंबईत मोसमातील पहिला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी आणि सोमवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच या जिल्ह्यात यलो अलर्टही जारी केला आहे.
आतापर्यत इतक्या पावसाची नोंद
गेल्या 24 तासात, IMD सांताक्रूझ वेधशाळेत 12 मिमी पावसाची नोंद झाली, जो संपूर्ण शहरात सर्वाधिक आहे.1 जूनपासून शहरात 94.3 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 114.1 मिमी कमी आहे.