पुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी
शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.
पुणे : शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे. फळे आणि भाजीपाला (Decreased income of fruits and vegetables in the market committee) घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे.
Bharat Bandh LIVE : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
एरवी दररोज किमान ९०० मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केट मध्ये शांतता दिसत आहे.
नवी मुंबईत कडकडीत बंद
दरम्यान, नवी मुंबईत (Navi Mumbai) भारत बंदला (Bharat Bandh) पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.