Tender scam in Sambhajinagar: आता बातमी आहे 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. संभाजीनगर महापालिकेतील (Sambhajinagar Municipal Corporation) पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Yojana) राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया माहिती थेट ईडीने ( ED) मागवली आहे. निविदा प्रक्रियेसाठी  रिंग करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात गुरुवारी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने शासनाचा चौकशी अहवाल मागवला आहे. या घोटाळ्याची लोकप्रतिनिधीनीं तक्रार केली होती.. त्यानंतर मनपाने याची चौकशी केली. राज्य सरकारने सुद्धा चौकशी समिती बसवली होती. 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अब्नेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड


मराठवाड्यातील संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झालाय (Tender scam) एकाच लॅपटॉपवरुन टेंडर भरण्यात आल्याचं उघड झाले. त्यामुळे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या (Aurangabad News) तक्रारीवरुन तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक आणि भागीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. आता ईडीने यात लक्ष घातल्याने या घोटाळ्याची व्याप्ती पुढे येण्याची शक्यता आहे. संभाजीनगर पालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे आता याला राजकीय रंग लागण्याची शक्यता आहे. 


याआधी या घोटाळ्याची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. यामुळे मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. आता ईडीने माहिती मागवली असल्याने चौकशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची 128 हेक्टर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती.