मुंबई : 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही लिंक शेअर केली आहे. या लिंकवरूनच विद्यार्थ्यांना 10वी, 12वीचा सराव संच उपलब्ध होणार आहे.  (Question Bank for ssc and HSC)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमच पूर्ण करावा लागलाय. या सरावसंचामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास शिक्षण विभागानं व्यक्त केला आहे.



एप्रिल-मे महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रश्न संच (Question Bank) उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत. परीक्षा कशा प्रकारे घ्यायच्या याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे. यासाठी सरकारने समिती देखील नेमली आहे.


प्रश्नसंच (Question Bank) साठी लिंकवर क्लिक करा - https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi


दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक याआधी जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. (SSC and HSC Exam)