दुकानात WINE विक्री केली तर... इम्तियाज जलिल यांचं राज्य सरकारला `हे` खुलं आव्हान
सुपरमार्केटमध्ये WINE विक्रीच्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलिल यांनी आव्हान दिलं आहे
औरंगाबाद : किराणा दुकानांमध्ये वाईन (Wine) विकण्याच्या निर्णयाला औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी कडाडून विरोध केला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही हे राज्य शिवछत्रपतींचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि असला निर्णय इथं खपवून घेतला जाणार नाही असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादेत राज्य सरकारने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) ,उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) वा आणि कोणी येऊन या प्रकाराचे उद्घाटन करून दाखवावं हे दुकान फोडण्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल असं खुलं आव्हान इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
वाईन विकून महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा हा घाट असल्याचं सांगत वाईनरी उद्योगाने शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर मग त्यांना चरस गांजाची शेती करण्याची सुद्धा परवानगी द्या अशी मागणी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
औरंगाबादमध्ये तरी एकही किराणा दुकानांमध्ये वाईन विकू देणार नाही असा प्रयत्न कुणी केल्यास मी स्वतःते दुकान फोडणार आणि माझ्या कार्यकर्त्यांना या राज्यातील माया बहिणींना असले प्रकार कुठे आढळले तर ते दुकान फोडून टाका अशा पद्धतीचा आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे.