2019 मध्येच महाराष्ट्रात सर्वांना घरं देणार- मुख्यमंत्री

पंतप्रधान आवास योजनेतील घरांच वाटप सध्या शिर्डीत सुरू आहे.
शिर्डी : 2019 मध्येच महाराष्ट्रात सर्वांना घरं देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. शिर्डीत सुरू असलेल्या साई समाधी सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. पंतप्रधानांच्याहस्ते यावेळी लाभार्थींना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच वाटप सध्या शिर्डीत सुरू आहे.
6 लाख घरांची आवश्यकता
शिर्डीतील अनेक प्रकल्पांचं भूमीपुजन आज करण्यात आलं. अडीच लाख जणांना घरांचं वाटप होत असून आम्हाला आणखी 6 लाख घरांची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
गरिबी हटविण्यासाठी साईंचा आशीर्वाद मिळावा असेही ते म्हणाले.