MK Madhavi : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त झटका बसला आहे.  ऐरोलीतील माजी नगरसेवक आणि उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना अटक झाली आहे.  ठाणे खंडणी विरोधी पथकाने  एम के मढवी यांना अटक केली आहे. 


नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 5 मध्ये असलेल्या कार्यालयातून  एम के मढवी यांना  पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.  ठेकेदाराला  2.5  लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे.  एम के मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आले.