NIA and ED Action in Maharashtra : एनआयएने (NIA) मोठी कारवाई करताना राज्यातून PFI च्या 20 जणांना ताब्यात घेतले आहे. इस्लामिक संघटना पीएफआयवर नवी मुंबई, पुण्यासह देशभरात एनआयए, ईडीचे छापेमारी केली. राज्यात 20 तर देशभरातून 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए आणि ईडीने छापे सुरू केलेत. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे सुरु आहेत. 100 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आलीय. राज्यातूनही 20 जणांना अटक करण्यात आलीय. पुण्यातून कौसर बागेत टाकलेल्या छाप्यातून पीएफआयचा महाराष्ट्र सचिव रजी अहमद खान आणि कय्यूम शेख यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्याअंतर्गत ही अटक झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशविरोधी कारवाया करण्यात आल्याचा गुन्हा या दोघांवर दाखल आहे. दहशतवादी कारवाया, टेरर फंडींग, दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग कँप आयोजित करणे, बंदी असलेल्या कट्टर संघटनांमध्ये तरूणांची भरती करणे अशा कारणांखाली ही कारवाई केली जात आहे. एनआयएने 106 हून अधिक जणांना अटक करण्यासोबतच डिजिटल गॅजेट्स, कागदपत्र, काही शस्त्र तसंच रोकडही जप्त केलीय. 


दरम्यान, नवी मुंबईतही NIA चे छापेमारी केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर हे छापे मारले आहे. नेरुळ सेक्टर 23 मधील दारावे गावात असणाऱ्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला आहे. NIA चे अधिकारी कार्यालयात मागील सहा तासांपासून तपास करत आहेत.  NIA चा गुन्हा वेगळा आहे. टेरर फडींग देश विघातक कृत्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात मनी लंड्रिंगचां ही संशय असल्याने ED आणि GST दोघेही सहभागी झाले आहे. सामाजिक संस्थांच्या नावाखाली देश विघातक कृत्य केल्याचा NIA चां आरोप आहे.


या शहरांत ठिकठिकाणी छापेमारी


पुण्यात चार ठिकाणांसह महाराष्ट्रात 20 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. देशात 200 ठिकाणी एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आली आहे. NIA यांच्याबरोबर ED आणि  राज्य पोलिसांची PFI विरुद्ध देशभरात छापेमारी केली आहे.



पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे ,कोहलापूर ,बीड , परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  


देशभरातील 12 राज्यांमध्ये छापेमारी


NIA and ED Action:राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने केरळ आणि तामिळनाडूसह देशभरातील 12 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ठिकाणांवर आणि त्याच्या लिंक्सवर छापे टाकले आहेत. पीएफआय, ईडी आणि एनआयएशी संबंधित लोकांवर टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्याच्या प्रकरणात राज्य पोलिस दलाच्या टीमने यूपी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवाया, प्रशिक्षण शिबिरे चालवणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे अशा व्यक्तींच्या निवासी आणि अधिकृत जागेवर हे छापे टाकले जात आहेत. एनआयएच्या छाप्यामुळे संतप्त झालेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये निदर्शने केली.