...असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव
राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान... पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळी वाट धरणार का याची चर्चा सुरू झालीय.. या चर्चेचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेलं एक विधान.. विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता असल्याचं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलंय... तर 80 ते 100 जागांची मागणीही मिटकरींनी केलीय.
अमोल मिटकरींच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही.. तसंच मिटकरींनी तोंडावर आवर घालावा असा सल्ला भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिलाय. दरेकरांनी मिटकरींवर हल्लाबोल केल्यावर शांत राहतीत ते मिटकरी कसले.. दरेकरांनी मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा स्वतःच्या तोंडाला आवर घालण्याचा प्रतिहल्ला मिटकरींनी चढवलाय
अजित पवार गट नाराज
संघाचं मुखपत्र असो किंवा मग रामदास कदम.. लोकसभा निकालानंतर पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या गटात नाराजी असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे जागावाटपावरुनही अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलीय. 2019 मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या 121 जागा लढवल्या होत्या. आताच्या विधानसभा निवडणुकीत 80 ते 100 जागांची मागणी अजित पवारांच्या गटाने केलीय. मात्र आता अजित पवार महायुतीत आहेत.. तेव्हा जागावाटपाची मागणी पूर्ण न झाल्यास अजित पवार वेगळी वाट धरणार. असा प्रश्न मिटकरींच्या विधानामुळे उपस्थित झालाय..
अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलंय. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना घरवापसीची संधी देण्यात येणार असल्याचं संकेतच पवारांनी मुंबईत बोलताना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील अंतिम निर्णय घेतील, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.