मुंबई: नाशिकची यशवंतराव चव्हाण मूक्त विद्यापीठ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र सेनानी विनायक दामोदर सावरकर उर्फ वीर सावरकर यांना हिंदुत्ववादी विचारधारना असलेले कट्टरपंथी आणि दहशतवादी सांगितले आहे. विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासात वीर सावरकरांचा चुकीचा इतिहास सांगितला आहे. 1885 साली सुरु झालेल्या भारतीय संघर्ष चळवळी बद्दल चुकीची माहिती पुस्तकात छापण्यात आली आहे. पुस्तकातील 'दहशतवादी क्रांतिकारी आंदोलन' धड्यात वीर सावरकर  वासुदेव बलवंत फड़के, पंजाबचे रामसिंग कुका, लाला हरदयाल, रास बिहारी बोस यांसारख्या क्रांतिकारकांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलनात वीर सावरकरांची काय भूमिका होती?
19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवाद आणि कट्टरवाद पसरवण्यात आला होता आणि धड्याच्या स्वध्यायात 'दहशतवादी क्रांतिकारी आंदोलनत वीर सावरकरांची काय भूमिका होती?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि प्रश्नाचे उत्तर 'आतंकवादी' असे देण्यात आले आहे.


मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नारायण मेहरे यांनी सांगितले पुस्तकातील वादाचे मुद्दे बदलण्यात येणार आहेत. ते म्हणाले 'पुस्तकात सावरकरांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. हे पुस्तक 2001 साली लिहलेलले आहे. पण याआधी कधीही विवाद झालेला नाही. फक्त माराठी माध्यामातून ही तक्रार आली आहे. मला कोणताही विवाद नको आहे, म्हणून पुस्तकातून विवादित भाग काढला जात आहे'. हे पुस्तक प्रध्यापक एनसी दीक्षित आणि प्रध्यापक अरुण भोसले यांनी लिहले आहे.