कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. नारायण राणेंनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आणयला नको असं राणेंनी आवर्जून नमूद केलं. केंद्रात गडकरी आणि राज्यात फडणवीस सर्वांगीण विकास करत असल्याचं राणेंनी कौतुक केलं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी राणेंची एन्ट्री होताच राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध बघायला मिळालं.


स्थानिक काँग्रेस पदाधिकारी दत्ता सामंत, सतीश सावंत, राकेश परब, रणजित देसाई यांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारला. त्यावरून या नेत्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर असताना काँग्रेस जिल्हाध्यक्षालाही स्थान मिळावं, अशी मागणी हे नेते करत होते. त्यावर हे आयोजकांचं काम असल्याचं सांगत पोलिसांनी सावंत आणि सामंत यांना ताब्यात घेतलं.