नाशिक : जो बळीराजा सर्वांची अन्नाची गरज भागवतो, तोच पूरता अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यावर त्यांनी घेतलेलं पीक कवडीमोल दरामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ ओढावलीये. या सर्व स्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशकात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टॉमेटो फेकत लाल चिखल केलाय. टॉमेटोला एका कॅरेटमागे 10 रुपयांचा दरही मिळत नसल्याने हा आक्रोश व्यक्त केला आहे. (In Nashik farmers threw tomatoes on the road as they got lower rates)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नक्की काय झालं?


शेतकरी शेतात राब राबतो. मात्र त्याच्या मेहनतीला काहीच भाव मिळत नाही. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं राज्यातला शेतकरी पुरता हवालदिल झालाय. नाशिकच्या सिन्नर चौफुलीवर टोमॅटो फेकत शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर लाल चिखल झाला होता. 10 रूपये कॅरेटनेही कुणी टोमॅटो घेत नसल्याची स्थिती आहे. शेतक-यांचा आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकत होता.