ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, उस्मानाबाद : मृत्यू दखी कुणाला कसा गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक भयानक घटना धाराशीव (Dharashiv) अर्धात उस्मानाबादमध्ये (Osmanabad) घडली आहे. ऑक्सीजन सिलेंडर (oxygen cylinder ) डोक्यात पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एका प्रायव्हेट हॉस्पीटल समोरच ही धक्कादायक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळत असताना ऑक्सिजनचे सिलेंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरामध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


आर्यन अमर नलवडे (वय नऊ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 


रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलेंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते असा आरोप करत नातेवाईकांनी केला आहे. तसेच हॉस्पिटलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आर्यनच्या नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. सध्या हॉस्पिटल परिसरात प्रचंड गर्दी जमली असून तणावाचं वातावरण आहे.


विजेच्या खांबासोबत खेळताना मुलाचा मृत्यू


विजेच्या खांबासोबत खेळताना दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यात घडली होती. गफूर नगर भागात विजेच्या खांबाला (Electric Poles) स्पर्श केल्याने अर्शद अहमद अशफाक मोमीन या दहा वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. खेळता खेळता  अर्शद विजेच्या खांबाला पकडतो. पण दुर्देवाने अर्शदला विजेचा जोरदार झटका लागला आणि तो खांबालाच चिकटतो. वीजाचा झटका बसल्याने अर्शद याचा जागीच मृत्यू झाला.