नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नांदगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ कुटुंबीय शेती कामात रमलेत. निवडणूक प्रचारासाठी भुजबळ परिवाराने कार्यकर्त्यांसह मतदार संघातील ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याने उमेदवारांना थेट शेतकऱ्याच्या बांधावर जावे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंकज भुजबळ यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चालविला. आणि बैलगाडीवरूनही रपेट मारली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी विशाखा भुजबळ यांनीही प्रचारादरम्यान चक्क शेतात कांदे लागवड करीत शेतमजूर महिलांबरोबर संवाद साधला. 



निवडणुकीत मतांचा जोगावा मागण्यांसाठी उमेदवार विविध क्लुप्त्या शोधत असतात निवडणुकीच्या निमित्ताने का होईना पंकज भुजबळ आणि त्यांचं कुटुंब शेतीच्या कामात रमतांना दिसत असल्याची चर्चा आहे.